आंगणेवाडीच्या भराडी देवी मंदिरापर्यंत जाणारे रस्ते झाले चकाचक

ना.रवींद्र चव्हाण यांनी दिला १७ कोटीचा निधी;कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांची तत्परता

⚡कणकवली ता.३१-: आंगणेवाडी मंदिराकडे येणाऱ्या सुमारे ७३ किलोमिटर लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आंगणेवाडी यात्रोत्‍सवासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास यंदा सुखकर होणार आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून त्‍यासाठी आंगणेवाडीला जोडणारे ९ रस्त्यांसाठी १७ कोटींचा निधी उपलब्‍ध झाला. त्‍यामुळे ही कामे तातडीने पूर्ण करता आली.त्यामुळे आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रेचा प्रवास विनासायास आणि खड्डेमुक्त होणार आहे.अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी हे रस्ते विकसित करण्यासाठी निधी दिला. तर केंद्रीय उद्योगमंत्री ना.नारायण राणे यांनी अधिकाऱ्यांना आढावा बैठक घेत आवश्यकत्या सूचना दिल्या होत्या. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी आंगणेवाडीपर्यंत जाणाऱ्या रस्त्यांसंदर्भात मंत्रालय स्तरावर बांधकाम मंत्र्यांकडे पाठपुरावा केला होता. भाजपा प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी सुद्धा भराडी देवीच्या मंदिरापर्यंत पोहोचणारे हे रस्ते सुस्थितीत व्हावेत यासाठी मागणी केली होती. तर सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी तत्परता दाखवत विकास कामांची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून ही कामे पूर्ण केली आहेत.

कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी आपल्‍या दालनात श पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, सिंधुदुर्गचे सुत्रूप असलेले पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम खात्‍याला भरघोस निधी उपलब्‍ध करून दिला.
आंगणेवाडीच्या भराडी देवी यात्रेला लाखो भाविकांची गर्दी असते. या यात्रेत सर्व भाविकांना सहभागी होणे शक्य व्हावे म्हणून सार्वजनिक बांधकाम कणकवली विभागाने युद्धपातळीवर कामे पूर्ण केली आहेत.७३ किलोमीटरचे रस्ते ज्यात, काळसे कट्टा रस्त्यासाठी दीड कोटी, मालवण बेळणा रस्त्यासाठी अडीच कोटी, गोळवण पोईप रस्त्यासाठी दीड कोटी, ओझर, कांदळगाव, मागवणे, मसुरे, बांदीवडे, आडवली, भटवाडी रस्त्यासाठी दोन कोटी, राठिवडे हिवाळे, ओवळीये कसाल रस्त्यासाठी दोन कोटी, चौके धामापूर रस्त्यासाठी सव्वा कोटी, कुमामे नांदोस सावरवाड रस्त्यासाठी सव्वा कोटी, चौके आमडोस माळगाव मसुरे रस्त्यासाठी ४ कोटी ३१ लाख आणि बिळवस आंगणेवाडी रस्त्यासाठी सव्वा दोन कोटी रूपये खर्च करण्यात आल्‍याचेही श्री.सर्वगोड म्‍हणाले.

आंगणेवाडी येथे भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी बीएसएनल आणि जीओ या कंपन्यांनी एक लाख ग्राहकांच्या कनेक्‍टिव्हीटीची व्यवस्था करावी असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले आहेत. त्‍याचीही पूर्तता यात्रोत्‍सवापूर्वी होईल. तर आंगणेवाडीत येणाऱ्या भाविकांसाठी यंदा ६० तात्‍पुरत्या स्वरूपातील शौचालये आणली जाणार आहेत. यातील १० शौचालये आंगणेवाडीतील बसस्थानक परिसरात ठेवण्यात येणार आहेत. या शाैचालयांमध्ये पाणी आणि सफाईसाठी स्वतंत्र कर्मचारी तैनात केला जाणार असल्‍याचेही श्री.सर्वगोड म्‍हणाले.
कायमस्वरूपी दोन कोटी रुपयांची शौचालय आंगणेवाडी येथे बांधली जाणार आहेत. त्याला मान्यता मिळालेली आहे अशी माहिती कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड यांनी दिली.

रस्त्यासाठी दोन कोटी, राठिवडे हिवाळे, ओवळीये कसाल रस्त्यासाठी दोन कोटी, चौके धामापूर रस्त्यासाठी सव्वा कोटी, कुमामे नांदोस सावरवाड रस्त्यासाठी सव्वा कोटी, चौके आमडोस माळगाव मसुरे रस्त्यासाठी ४ कोटी ३१ लाख आणि बिळवस आंगणेवाडी रस्त्यासाठी सव्वा दोन कोटी रूपये खर्च करण्यात आल्‍याचेही श्री.सर्वगोड म्‍हणाले.

You cannot copy content of this page