यशस्वी लोकांचे अवॉर्ड पाहून आपल्या मुलांना तसे घडविण्याचा प्रयत्न करा…

स्वप्नील बांदोडकर यांचे आवाहन;

⚡सावंतवाडी ता.३१-: येथील कळसुलकर हायस्कूल परिसरात सुरु केलेल्या इन्स्पीरेशनल वाॅलच्या माध्यमातून पालकांनी यशस्वी लोकांचे अवॉर्ड पाहून भविष्यात आपल्या मुलांना त्याप्रमाणे घडविण्याचा प्रयत्न करा असे आवाहन सुप्रसिध्द पार्श्वगायक ‘राधा ही बावरी’ फेम स्वप्निल बांदोडकर यांनी केले.

येथील कळसुलकर हायस्कूलच्या सन 1992 – 93 इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून पार पडलेल्या “इन्स्पीरेशनल वाॅल” च्या उद्घाटक सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, आंतराष्ट्रीय क्रिडा प्रशिक्षक अजित कुलकर्णी, एन के टी काॅलेज मुंबईचे ट्रस्टी परेश ठक्कर, सरस्वती विद्यालय मुबईचे ट्रस्टी जिग्नेश पटेल, शाळेचे मुख्याध्यापक एन पी मानकर आदी उपस्थित होते.
श्री बांदोडकर म्हणाले, इन्स्पीरेशनल वाॅल च्या कार्यक्रमाला याठिकाणी मला येता आले यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो, ज्यावेळी आपण शाळेचा गणवेश करतो तेव्हा सर्वजण एकाच प्रक्रियेत येतो तेथे कुढला जात पात धर्म नसतो,आपण फक्त शाळेचा विद्यार्थी असतो,आज या कार्यक्रमामुळे मला माझ्या शाळेची आठवण झाली. इन्स्पीरेशनल वाॅल साठी माझी अवॉर्ड जेव्हा मुन्ना पोकळे यांनी देशील का असे विचारले तेव्हा मनात प्रश्न निर्माण झाला. की अवॉर्ड अशी कशी देऊ मात्र दुसर्या क्षणी असा विचार आला की माझी मेहनत पाहून जर येणार्या पिढीला त्या उपयोग होत असेल तर मला त्यापेक्षा मोठ अजून काय. आज कळसुलकरच्या १९९२-९३ च्या बॅटने पुढे आणलेली ही कन्सेप्ट पालक आणि मुलासाठी उपयुक्त आहे. मात्र पालकांनी फक्त अवॉर्ड न पाहता आपल्या मुलांनी अशी अवॉर्ड मिळविण्याच्या दृष्ठीने घडवा.
अजित कुलकर्णी म्हणाले, आपण जेव्हा दहावीला होतो तेव्हा खेळासाठी वडीलांनी खुप विरोध केला मात्र याच खेळाने माझे करिअर घडविले, खेळामुळे नुकसान होत नाही, एक तास सरावासाठी दिल्यास आपण आपला खेळ उत्तम खेळू शकला. व त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात नक्कीच मिळेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुन्ना पोकळे यांनी मांडले त्यांनी इन्स्पीरेशनल वाॅल ही संकल्पना कशी सुचली त्याचे फायदे काय हे पटवून दिले तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई यांनी मानले.

You cannot copy content of this page