शिरोडा नाका येथे मुजावर कुंटूबियांची नविन शाखा; उद्या होणार उद्घाटन..
⚡सावंतवाडी ता.३१-: बेकरी व्यवसायात तब्बल ६० वर्ष अनुभव असलेल्या श्री.सऊद मुजावर कुंटूबियाकडून “फ्रेश बेक्स बेकर्स” च्या माध्यमातून आता सावंतवाडी शहरात दर्जेदार स्वादिष्ट बेकरी पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. येथील शिरोडा नाका येथे उद्या ता. १ फेब्रुवारीपासून ही सेवा उपलब्ध होणार आहे. तरी ग्राहकांनी यांचा लाभ घावा असे विनंती श्री मुजावर यांनी केले आहे.
श्री.मुजावर म्हणाले, आमचे कुटूंब १९६० पासून या व्यवसायात आहेत, आणी त्याच्या वेगवेगळ्या ठिकाणी शाखा आहेत. आणी आता सावंतवाडीत आमची नवीन शाखा सुरु करतांना आनंद होत आहे, “फ्रेश बेक्स बेकर्स” या नावाने ही शाखा सुरु करत असून सावंतवाडी आणि सिंधुदुर्गवाशियासाठी ही सेवा आहे.
यामध्ये दर्जेदार ,स्वादिष्ट व ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे बेकरी पदार्थ आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत. यात नानकेट, बिस्किट्स, बर्थडे केक्स, टोस्ट, खारी, लोणी बटर, लोणी टोस्ट फरसाण,चिवडा, ब्रेड ,पिझ्झा बेस वेगवेगळ्या फ्लेवर्सचे पॅटीस, दिलखुष, डोनेट्स,क्रीमरोल,डिनर रोल,जाम ब्रेड,असे विविध पदार्थ उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
तरी आपण उद्या सकाळी 10 वा.उपस्थित राहून आमच्या शुभारंभ कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे न्रम विनंती मुजावर कुटुंबियांकडून करण्यात आली आहे.तसेच अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरला
9168555769/8451809827 संपर्क करण्याचा विनंती देखील केला आहे.
