भरड नाका परिसरातील रस्त्यातील खड्डे बुजविले

माजी नगरसेवक यतीन खोत यांनी केला पाठपुरावा

मालवण, दि प्रतिनिधी
मालवण शहरातील भरड ते बांगीवाडा या रस्त्यावर ठीकठिकाणी पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व वाहनचालकानी माजी नगरसेवक यतीन खोत यांचे लक्ष वेधल्यानंतर श्री खोत यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून आज या रस्त्यावरील खड्डे बुजविण्यास भाग पाडले

मालवण भरड ते बांगी वाडा या रस्त्यावर पडलेल्या खड्डयाबाबत स्थानिक नागरिक व वाहनचालकानी माजी नगरसेवक यतीन खोत यांचेकडे खड्डे बुजविण्याची मागणी केली होती.


यावेळी डांबरीकरण माध्यमातून खड्डे बुजवणे यासाठी आपले प्रयत्न राहतील असा शब्द खोत यांनी नागरिकांना दिला होता. पालिका प्रशासनालाही लवकरात लवकर डांबरीकरण करत खड्डे बुजवण्यासाठी खोत यांनी लक्ष वेधले होते… यतीन खोत यांच्या मागणीनुसार भरड येथील रस्त्यावर पडलेले खड्डे व बाजूचा मार्ग असे डांबरीकरणाचे काम आज मार्गी लावण्यात आले. त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page