देवलीतील शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत ठाकरे गटाला धक्का

⚡मालवण ता.३०-: मालवण तालुक्यातील देवली गावचे माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह अनेक ग्रामस्थांसह शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत मालवण भाजप कार्यालय येथे भाजपमध्ये प्रवेश केला.

यावेळी देवलीचे माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह शिवदास चव्हाण, रामू चव्हाण, गुरुनाथ चव्हाण, गुरुनाथ पाटकर, समीर वेतुरेकर, गुरुप्रसाद चव्हाण, अमित वाक्कर, आबा पोयरेकर, रोहन मयेकर, विजय सावंत, अक्षय चव्हाण, दिगंबर चव्हाण, प्रकाश चव्हाण, बंटी चव्हाण, विलास चव्हाण, मंगेश वाक्कर, महादेव चव्हाण, सागर करंगुटकर, संदेश वेतुरेकर, बबन परब, किशोर चव्हाण, शैलेश चव्हाण, राहुल चव्हाण, राजा सावंत, दीपेश माडये, समीर वाक्कर, राजेश पोपकर, महेंद्र थवी, अविनाश चव्हाण, संतोष मांजरेकर, नरेश चव्हाण, दत्ता गोवेकर, योगेश बोवलेकर, सिद्धेश बिरमोळे, अजित चव्हाण, निखिल चव्हाण, युधार्जित चव्हाण, दीपक चव्हाण, विनायक चव्हाण, आंनद चव्हाण, अजय चव्हाण व अन्य ग्रामस्थ यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी बोलताना निलेश राणे यांनी या भागाचा विकास भाजपच्याच माध्यमातून होऊ शकतो हे माहीत झाल्याने भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांची संख्या सर्वच ठिकाणी वाढत आहे. शतप्रतिशत भाजप हेच आमचे लक्ष आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आगामी पंचायत समिती, जिल्हापरिषद, नगरपालिका, विधानसभा या सर्व निवडणुकीत विजयाचा गुलाल हा भाजपचाच उडणार व विजयी झेंडा भाजपचाच फडकणार आहे. सर्वांनी जोमाने काम करावे असे आवाहन केले

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुका सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, जिल्हा परिषद विभाग निरीक्षक अशोक तोडणकर, खरेदी विक्री संचालक आबा हडकर, केपी चव्हाण, अवि सामंत, युवमोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, वासुदेव चव्हाण, विक्रांत नाईक, वैभव चव्हाण, राजू चव्हाण, महेश नाईक, सूर्यकांत चव्हाण, शक्ती केंद्र प्रमुख विरेश मांजरेकर, पांडुरंग मायनाक, हरीश गावकर, भाई मांजरेकर यासह अन्य उपस्थित होते.

फोटो :
देवली माजी सरपंच विजय चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ व ठाकरे गट कार्यकर्ते यांचा माजी खासदार निलेश राणे यांनी उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. (गणेश गावकर, मालवण)

You cannot copy content of this page