श्री गावडे काका महाराज यांची संकल्पना
बांदा/प्रतिनिधी
माड्याचीवाडी ता. कुडाळ येथील श्री स्वामी समर्थ मठामध्ये श्री श्री १०८ महंत मठाधीश प. पू. सदगुरू श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतुन महागणेश याग भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. या पवीत्र सोहळ्यासाठी केरळ राज्यातील जगप्रसिध्द पुजारी श्री जीत लंबोदरी यांनी केलेल्या मंत्रघोषात श्री सदगुरु गावडे काका महाराज यांच्या शुभहस्ते १००८ श्रीफळ या हवनात अर्पण करण्यात आले.
भावीकांच्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात, सर्वाना चांगल आरोग्य, दिर्घायुष्य लाभावे, सुखसम्रुध्दी, समाधान प्राप्त व्हावे यासाठी या सोहळा आयोजीत करण्यात आला होता. पुजारी श्री जीतने लंबोदरी यांना १२ मंदिरात पुजेसाठी निमंत्रीत केले जाते. प्राचीन परंपरा प्राचीन मंत्र जाग्रुत करण तसेच त्याचा प्रचार प्रसार करण हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. या सोहळ्या दरम्यान श्री सदगुरू भक्त सेवा न्यास व श्री स्वामी समर्थ श्रध्दा भक्त सेवा न्यासाचे या दोन्ही संस्थेच्या वतीने चालणाऱ्या या १८ उपासना केंद्रातील भाविकांच्या वतीने अखंड असा नामजप १ लाख २१ हजार वेळा करण्यात आला. श्री सदगुरू भक्त सेवा न्यास माड्याचीवाडी कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, मसले मालवण, वेंगुर्ला, बांदा, कारीवडे, बेळगांव, दिवा, सांताक्रुझ, घाटकोपर, कांदीवली, बेतीम गोवा, कोरगांव गोवा, पार्से गोवा, सांकपाळ गोवा, वास्को गोवा या उपासना केंद्रातील भावीकानी केलेल्या नाम जपामुळे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. हा सोहळा तळकोकणात पहिल्यादांच श्री सदगुरू गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतुन न भूतो न भविष्यती असा साकरण्यात आला. हजारो भक्तगणानी या सोहळ्या सोबत सदगुरू गावडे काकांचे आशिर्वाद घेतले.
