विरोधकांनी फुकटचे श्रेय घेणे थांबवावे : संजय कामतेकर
⚡कणकवली ता.३०-: कणकवली शहरातील बांधकरवाडी येथे रेल्वेस्टेशन हद्दीत असलेला एअरटेल नेटवर्क टॉवर गेले काही दिवस नेटवर्क ठप्प असल्याने शहरातील नेटवर्कचे मोठी समस्या निर्माण होत होती. या विषयी तात्काळ आवाज उठवत टॉवर चालू करण्याबाबत मागणी केली होती. याबाबत कणकवली नगरपंचायतचे गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक अभि मुसळे, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, अभय राणे, प्रकाश सावंत यांनी तात्काळ ट्रक टॉवरची पाहणी केली. टॉवर सुरू करण्याबाबत एअरटेल कंपनीशी संपर्क साधला. परंतु टॉवर स्थलांतरित करण्यास विलंब होत असल्याने या कालावधीत तात्काळ ट्रक टॉवर उभारण्यात आला. याबाबत वरिष्ठ अधिकारी यांना समस्या कळवून बांधकरवाडी दत्तमंदिर येथे ट्रक टॉवर उभारणीचे काम कालपासून सुरू करण्यात आले आहे.
यामुळे येत्या दोन दिवसात एअरटेल नेटवर्क सुरळीत होणार असून नेटवर्कची समस्या मार्गी लागणार आहे. मोबाईल धारकांची नेटवर्क अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता या ट्रक टॉवर उभारणी करण्यात आली. तरी याचा पाठपुरावा संजय कामतेकर यांनी केला होता. मात्र नेहेमीच कोणत्याही कामात फुकाचे श्रेय घेणारे विरोधी खासदार, आमदार, नगरसेवक यांनी श्रेय घेण्याचे काम केले असल्याचे गटनेते संजय कामतेकर यांनी सांगितले. विरोधकांनी स्वतः पाठपुरावा करून एअरटेल टॉवर बाबतीत केले नसल्याचे देखील श्री. कामतेकर यांनी सांगितले.
