कणकवली बांधकरवाडीत तात्पुरत्या स्वरूपात ट्रक टॉवर उभारणीचे काम सुरू

युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या मागणीला यश

⚡कणकवली ता.३०-: कणकवली बांधकरवाडी येथे रेल्वेच्या हद्दीत असलेला एअरटेलचा टॉवर गेले काही दिवस बंद असल्याने कणकवली शहरातील कनकनगर, परबवाडी, बांधकरवाडी सह अन्य भागांमध्ये नेटवर्कचा मोठी समस्या निर्माण होत होती. दरम्यान याबाबत नगरसेवक सुशांत नाईक यांनी खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांचे लक्ष वेधत तात्काळ टॉवर सुरू करण्याकरिता एअरटेल कंपनीशी संपर्क साधला होता.परंतु टॉवर स्थलांतरित करण्यास काही विलंब जाणार असल्याने या
कालावधीत तात्काळ ट्रक टॉवर उभारणीची मागणी केली होती.बांधकरवाडी दत्त मंदिर येथे हा ट्रक टॉवर उभारणीचे काम सकाळपासून सुरू करण्यात आले आहे.
यामुळे येत्या दोन दिवसात मोबाईल नेटवर्क सुरळीत होणार असून नेटवर्कची समस्या मार्गी लागणार आहे.यावेळी स्वतः युवा सेनेचे जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, शहर प्रमुख उमेश वाळके उपस्थित होते. मोबाईल धारकांची नेटवर्क अभावी होणारी गैरसोय लक्षात घेता.हा तात्पुरता स्वरूपात मोबाईल टॉवर उभारण्यात येणार आल्याचे सुशांत नाईक यांनी सांगीतले.

You cannot copy content of this page