प्राथमिक शिक्षक समितीची इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती सराव परीक्षा उद्या

२०८२ विद्यार्थी घेणार लाभ

ओरोस ता ३०
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग आयोजित जिल्हास्तरीय इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती मोफत शिष्यवृत्ती सराव परिक्षा आयोजन 31 जानेवारी 2023 रोजी करण्यात आले असून संपूर्ण जिल्ह्य़ात 120 परिक्षा केंद्रावर 2082 विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे. या परिक्षेला मुख्यकार्यकारि अधिकारी प्रजित नायर यांनी लेखी परवानगी दिली असल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्ग शाखेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
इयत्ता 5 वी जि प प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती सराव परीक्षेचा सराव होणेसाठी दरवर्षी शिक्षक समिती सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करत आहे. त्यानुसार मंगळवार 31 जानेवारी 2023 रोजी 8 तालुक्यात मिळून 120 परिक्षा केंद्रावर 2082 विद्यार्थी या सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कुडाळ 23 केंद्रे व 390 विद्यार्थी, सावंतवाडी 20 केंद्रे व 432 विद्यार्थी, वेंगुर्ला 14 केंद्रे व 252 विद्यार्थी, देवगड 19 केंद्रे व 231 विद्यार्थी, कणकवली- 22 केंद्रे व 272 विद्यार्थी, मालवण 15 केंद्रे व 199 विद्यार्थी, वैभववाडी 3 केंद्रे व 135 विद्यार्थी, दोडामार्ग 4 केंद्रे व 171 विद्यार्थी समावेश आहे.
या सराव परिक्षा प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी मालवण तालुक्यातील प्राथमिक शिक्षक संतोष नेरकर, विलास सरनाईक, प्रविण कुबल, सौ श्रध्दा वाळके आदींनी सहकार्य केले आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी या शैक्षणिक उपक्रमास लेखी परवानगी देत शिक्षक आमदार निवडणूकीच्या आचारसंहितेचे पालन करून परिक्षा घेण्यास परवानगी दिली आहे. याबाबत शिक्षक समिती सिंधुदुर्गच्यावतीने प्रजित नायर व शिक्षणाधिकारी प्राथमिक सिंधुदुर्ग महेश धोत्रे यांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.
या सराव परीक्षेस जिल्हयातील सर्व प्राथमिक इयत्ता 5 वी शिष्यवृत्ती परिक्षार्थींनी सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती सिंधुदुर्गच्यावतीने जिल्हाध्यक्ष नारायण नाईक, जिल्हासरचिटणीस सचिन मदने यांनी केले आहे.

You cannot copy content of this page