⚡वेंगुर्ला ता.२८-: विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यक्तिचा सोमवार दि. ३० जानेवारी रोजी उभादांडा येथील प.पू.आई नरसुले समाधी मंदिरात सत्कार करण्यात येणार आहे.
यामध्ये माजी आमदार नारायण महादेव चमणकर यांचे नातू तथा उभादांडा गावचे विद्यमान सरपंच निलेश जयप्रकाश चमणकर, उपसरपंच टिना कार्मिस आल्मेडा, सामाजिक कार्यकर्ते विलास दळवी, वेंगुर्ला नगरवाचनालय संस्थेचा पुरस्कार प्राप्त तथा दै.तरुण भारत डेक्स इनचार्ज अवधूत पोईपकर आणि तालुका पत्रकार संघातर्फे कै.संजय मालवणकर स्मृती आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल वेंगुर्ला येथील पत्रकार प्रथमेश गुरव यांचा समावेश आहे.
हा सत्कार सोहळा प.पू.आई नरसुले समाधी मंदिराचे व्यवस्थापक मोहनदास नरसुले यांनी आयोजित केला आहे. सोमवार दि. ३० रोजी सायंकाळी ४ वाजता उभादांडा येथील आई नरसुले समाधी मंदिरात होणा-या या सत्कार सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
