Headlines

उभादांदा सागरी महामार्ग रस्त्याच्या कामाला सुरुवात

नागरिक, संस्था यांच्या उपोषणाला यश

⚡वेंगुर्ला ता.२८-: उभादांडा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शेखर धावडे, वेंगुर्ला रिक्षा संघटना, जागृत नागरिक व दुचाकी तसेच चारचाकी वाहनधाकांनी केलेल्या उपोषण, आंदोलनामुळे अखेर उभादांडा सागरी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे.

  या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गेले दोन वर्षे सतत पाठपुरावा केला होता. अनेकवेळा आंदालने, उपोषणे सुद्धा केली होती. मात्र, या रस्ता दुरुस्तीचे काम मंजूर असूनही काम होत नव्हते. त्यामुळे २६ जानेवारी रोजी उपोषण केले होते. या उपोषणाला यश आल्याने तात्काळ या कामाला प्रारंभ झाला आहे.
You cannot copy content of this page