कुपेरीची घाटी येथे अनधिकृत वाळू वाहतूक करणारा डंपर पकडला

तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाची कारवाई

मालवण दि प्रतिनिधी
मालवण कुपेरीच्या घाटी येथे मालवणच्या दिशेने बेकायदेशीर खडीची वाहतूक करणाऱ्या डंपर मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पकडला. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील आणि त्यांच्या पथकाने सध्या बेकायदेशीर वाळू, खडी, चिरे उत्खनन व वाहतूक यांच्यावर कारवाई करण्याचा धडाका सुरू आहे. आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मालवणच्या दिशेने खडी घेऊन जाणारा एक डंपर मालवणचे तहसीलदार श्री. श्रीधर पाटील यांना आढळून आला त्यांनी चौकशी करता त्याच्याजवळ खडी वाहतुकीचा दुपारचा पास असल्याचे निदर्शनास आले अशी माहिती महसूल विभागाच्या पथकाने दिली. त्याच्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू होती.

You cannot copy content of this page