मानवी जगण्याचं वास्तव प्रतिबिंब आपल्या कवितेत दिसावं :सरिता पवार

⚡कणकवली ता.२७-: सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी,तोंडवली महाविद्यालयामध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला.या निमित्ताने महविद्यालात निबंध स्पर्धा,हस्ताक्षर स्पर्धा,घोषवाक्य स्पर्धा,वक्तृत्व स्पर्धा,स्वलिखित कविता वाचन स्पर्धा,वादविवाद स्पर्धा आणि अंताक्षरी यासारख्या विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्या स्पर्धेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होवून उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला.

ह्या स्पर्धेच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आले होते. स्वलिखीत कविता वाचन स्पर्धेसाठी विविध साहित्य पुरस्कार प्राप्त कवयित्री सरिता पवार प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहिल्या होत्या. ‘कवितेला एक सहज सुलभ अभिव्यक्ती न समजता अस्सल कवितेची भान आपल्या शब्दांत दिसायला हवं. सुखाचं गाणं गाणाऱ्या कवितेने दुःखाच्या कहाण्या सुद्धा मांडल्या पाहिजेत तरच ती चिरकाल टिकेल..’ अशा शब्दांत त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
तसेच या काव्यवाचन स्पर्धेचे परीक्षण नांदगाव हायस्कूलच्या शिक्षिका सौ.शर्वरी सावंत यांनी केले. वक्तृत्व स्पर्धेसाठी नांदगाव सरस्वती हायस्कूलचे शिक्षक राजेश नारकर हे परीक्षक म्हणून लाभले होते. ह्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.उज्वला खेडकर व आभार प्रदर्शन प्रा.अखिल काणेकर यांनी केले.
स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या सर्व स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष वसंत सावंत , संस्थेचे प्रशासकीय अधिकारी विनायक चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य तुकाराम केदार , तसेच सर्व शिक्षक ह्यांनी अभिनंदन केले.

You cannot copy content of this page