सावंतवाडी नगरपालिका घड्याळाची टिकटिक सुरू

माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या पाठपुराव्याला यश : दोन-तीन महिने बंद होते घड्याळ

⚡सावंतवाडी ता.२७-: शहरातील नगरपालिकेचे बंद असलेले घड्याळ अखेर आज सुरू झाले. त्यामुळे सावंतवाडी शहरातील नागरिकांना आता घड्याळाची टिकटिक ऐकू येणार आहे.

गेले दोन-तीन महिने शहरातील घड्याळ बंद होते. याबाबत माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगरपालिका प्रशासनाचे लक्ष वेधून बंद घड्याळ तात्काळ सुरू करण्याची मागणी केली होती. अखेर ते बंद घड्याळ करण्यात सुरू आल्याने माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांच्या पाठपुराला यश आले आहे. याबाबत नागरिकांकडून देखील समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page