बांदेश्वर मंदिर-सटमटवाडी रस्त्यावर झाड कोसळले…

*रस्ता वाहतुकीस बंद ; झाड बाजूला करण्याचे काम सुरू_

*💫बांदा दि.१२-:* बांदा शहरातील श्री वाळकेश्वर मंदिर समोरील वडाच्या झाडाची फांदी रस्त्यावर कोसळली. यामुळे बांदेश्वर मंदिर-सटमटवाडी रस्ता वाहतुकीस बंद झाला आहे. सुदैवाने रस्त्यावर वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली. येथील वडाचे झाड हे जीर्ण झाले आहे. यापूर्वी देखील या झाडाच्या फांद्या रस्त्यावर कोसळल्या होत्या. आज सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास अचानक रस्त्यावर फांदी कोसळली. याठिकाणी असलेल्या वीज वाहक तारांचे कोणतेही नुकसान झाले नाही. फांदी बाजूला करण्याचे काम उशीरापर्यंत सुरू होते.

You cannot copy content of this page