⚡कणकवली ता.२५-: युवा संदेश प्रतीष्ठान,सांगवे ,कनेडी व सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन,सिंधुदुर्गच्या मान्यतेने आयोजीत युवा संदेश जिल्हास्तरीय मॅरेथाॅन स्पर्धा २०२३ कनेडी येथे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये श्री फोंडकण देवी स्पोर्टस् ॲकॅडमी,निरोमच्या खेळाडुंनी मॅरेथाॅन स्पर्धेत परीतोषीक मीळवीलेल्या खेळाडु ,१७ वर्षाखालील मुली- ३ कि.मी धावणे – कु.कामीनी मनोहर राऊत ( द्वतीय क्रमाक ) ,महिला खुल्या गटात – ५ कि.मी धावणे :- कु. स्वप्नाली भास्कर बेनकर हिने द्वितीय क्रमांक तर कु.माधवी सुनील शेंगाळे,क्.प्रणाली प्रभु यांचा सहभागी तर मुलांच्या १७ वर्षा खालील ४ कि.मी धावणे क्. साहील सुनील शेंगाळे यांनी सहभागी झाला ,या स्पर्धेत आयोजक अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत ,स्पर्धाप्रमुख प्रमोद पवार,प्रशांत बोभाटे,सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशन,सिंधुदुर्गचे सहसचिव समीर जयवंत राऊत व सर्व मंडळाचे पदाधिकारी याच्याहस्ते पारीतोषक देण्यात आले व कु.अंजली जयसिंग गायकवाड (तालुका महिला क्रीडा प्रमुख ) यांचे अभिनंदन केले .
