⚡सावंतवाडी ता.२३-: शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ज्येष्ठ शिवसैनिकांनी आज दरवर्षीप्रमाणे पाळणे पुणे येथील धरणावर बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला लावलेल्या कल्पवृक्षाच्या ठिकाणी जाऊन नतमस्तक होऊन साजरी केली .
माजी नगराध्यक्ष साळगावकर गेली अनेक वर्षे बाळसाहेंबाचा वाढदिवस साखर वाटून साजरा करत होते,त्यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाला पाळणे कोंड धरणावर पाच माडाची झाडे एकत्र लावली होती त्यातील तीन कल्पवृक्ष मोठे झाले असून त्यांना नारळ लागण्यास सुरुवात झाली आहे व ते ब्रम्हा विष्णू महेश च्या रुपात उभे आहेत, बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून साळगावकर आपल्या जुन्या सहकाऱ्यांसमवेत पाळणे कोंड धरणावर जाऊन त्या स्थळी नतमस्तक होतात,आज बाळासाहेब ठाकरे यांचे सच्चे सैनिक त्या ठीकाणी पोहचले व जयंती साजरी केली
यावेळी माजी शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल परुळेकर माजी नगराध्यक्ष माजी उपजिल्हाप्रमुख बबन साळगावकर माजी नगरसेवक सुरेश सुरेश भोगटे ,विलास जाधव श्री संदीप टोपले श्री,सिताराम गावडे, दीपक सावंत, सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव रिक्षा चालक सेनेचे सुधीर पराडकर ,प्रसाद कुडतरकर, गणपत बांदेकर, महेश नार्वेकर ,बावतीस फर्नांडिस, जावेद शेख, सुभाष पोकळे,बंड्या तोरसेकर,संतोष जोईलआदि उपस्थित होते .
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर व सहकाऱ्यांनी केली साजरी
