सावंतवाडी पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेतील “जर्सी” व चषकाचे आज अनावरण…

उद्या रंगणार सामने;सिंधुदुर्गातील पत्रकारांचे आठ संघ होणार सहभागी…

⚡सावंतवाडी ता.१९-: तालुका पत्रकार संघाच्या वतीने भरवण्यात आलेल्या “इडमिशन” पुरस्कृत “बाळशास्त्री जांभेकर चषक” जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी बनविण्यात आलेल्या जर्सी व चषकाचे अनावरण आज माजी आरोग्य सभापती अँड परिमल नाईक व माजी नगरसेवक उदय नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.दरम्यान या स्पर्धेचे उद्या सकाळी येथील जिमखाना मैदानावर मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्यानंतर जिल्ह्यातील 8 संघांमध्ये क्रिकेटचे सामने रंगणार आहेत.यावेळी भाजप पदाधिकारी संतोष गावंस उपस्थित होते.

You cannot copy content of this page