माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांचा आरोप
⚡सावंतवाडी ता.१९-: मंत्री दीपक केसरकर यांची पावले हळू हळू भाजप कडे वळू लागल्याने ते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे गोडवे गात आहेत. त्यांच्यातील हा बदल हा फक्त स्वार्थासाठी आहे, असा आरोप माजी राज्यंमत्री प्रवीण भोसले यांनी आज केला आहे. दरम्यान नारायण राणे यांचा आशीर्वाद जर मिळाला नाही तर ते भाजपमध्ये प्रवेश करू शकत नाही. ते माहित असल्याने ते आता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचा गोडवा गात आहेत, असा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.
ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
