Headlines

मराठा समाज, कुणबी मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटरचा सहा महिन्याचा कोर्स मोफत

⚡कणकवली ता.१९-: मराठा समाज, कुणबी मराठा समाज या समाजातील 18 ते 45 वर्षे वयोगटातील लोकांसाठी महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित पुणे आणि छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) पुणे यांच्यामार्फत कॉम्प्युटरचा सहा महिन्याचा कोर्स मोफत शिकविला जाणार आहे

मराठा समाज, कुणबी मराठा समाजातील ज्यांचे वय 18 ते 45 वर्षे आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे व ज्यांच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट आहे किंवा मागील ३ वर्षाचे इनकम सर्टिफिकेट आहे अशा मुलांसाठी प्रशिक्षण केंद्र कणकवली तालुक्यासाठी कणकवलीमधील फक्त मधुरा कॉम्प्युटर सेंटर देण्यात आले आहे .
मराठा समाज, कुणबी मराठा समाजातील ज्याना हा कोर्स करायचा असेल त्यांनी रश्मी रविन्द्र बाईत (9421266745,
7058170940) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page