शिंदे सरकार मधील जिल्ह्यातील मंत्री अपयशी

सहा महिन्यात आरोग्याची सुविधा सुधारू शकते नाहीत;राष्ट्रवादीचे नेते प्रवीण भोसले यांचा गंभीर आरोप

⚡सावंतवाडी ता.१९-: शिंदे सरकार येऊन सहा महिने झाले. यात जिल्ह्याला दोन मंत्री पद मिळाली असताना जिल्ह्याची सहा महिन्यात कोणती प्रगती झाली ? असा सवाल माजी राज्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते प्रविण भोसले यांनी केला आहे.

दरम्यान, आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्याची बेकार परिस्थिती आहे. मात्र, हे मंत्री आरोग्याच्या सुविधा सुधारू शकले नाहीत. त्यामुळे हे दोन्ही मंत्री पूर्णपणे अपयशी ठरले असून केवळ मोठ मोठ्या घोषणा करून जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप देखील भोसले यांनी मंत्री दिपक केसरकर व उदय सामंत यांच्यावर केला आहे. ते येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी,शहराध्यक्ष देवा टेंमकर,इफतिकार राजगुरु,राकेश चितारी आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page