मालवण दि प्रतिनिधी
मालवण शहर पंचायत समिती मार्गावर मनसे कामगार सेना कार्यध्यक्ष नंदकिशोर तळावडेकर यांच्या माध्यमातून उपलब्ध झालेल्या सोलर लाईटचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी मनसे महिला माजी शहर अध्यक्ष भारती वाघ व भाई मालंडकर, मनविसे तालुका अध्यक्ष संदीप लाड, शाखा अध्यक्ष तुषार जुवेकर, माजी तालुका अध्यक्ष रामनाथ पराडकर आणि माजी शहर अध्यक्ष विशाल ओटवणेकर उपस्थित होते.
