वैभववाडीः तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीच्या सरपंच,उपसरपंच निवडणूक गुरुवारी पार पडली.यामध्ये ११ ग्रामपंचायतीवर सरपंच, उपसरपंच यांची बिनविरोध निवड झाली आहे.तर २ ग्रामपंचायतमध्ये निवडणूक घेण्यात आली.१३.पैकी १० ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच तर नऊ ग्रामपंचायतीवर उपसरपंच विराजमान झाले आहेत.तर शिवसेनेचे तीन ग्रामपंचायतीवर सरपंच,चार उपसरपंच विराजमान झाले आहेत.निवडणूक प्रक्रीया सर्वञ शांततेत पार पडली.सर्व सरपंच उपसरपंचाचे सर्वञ अभिनंदन करण्यात येत आहे. तालुक्यातील १३ ग्रामपंचायतीची निवडणूक १५ जानेवारीला पार पडली होती.या निवडणूकीत १३ पैकी ९ ग्रामपंचायतीवर भाजप प्रणित पॕनल विजयी झाले होते.तर चार ग्रामपंचायतीवर शिवसेना पुरस्कृत पॕनल विजयी झाले होते.यातील कुंभवडे ग्रामपंचायतीत शिवसेनेचे ४ तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले होते.माञ त्यानंतर झालेल्या आरक्षण सोडतीत कुंभवडे सरपंच नामाप्र साठी राखीव झाले.माञ नामप्र उमेदवार भाजपचा असल्यामुळे याठिकाणी भाजपचा सरपंच विराजमान होणार हे निश्चित होते.भाजपने राजकीय खेळी करीत शिवसेनेतून निवडून आलेल्या उमेदवाराला आपल्या पॕनलमध्ये घेत त्याला उपसरपंच पद दिले त्यामुळे या ग्रामपंचायतीवर भाजपचा सरपंच उपसरपंच विराजमान झाला आहे. ग्रामपंचायत निहाय बिनविरोध निवड झालेले सरपंच उपसरपंच खालीलप्रमाणे . १.ग्रामपंचायत नाधवडे भापजच्या पॕनलचे ६ तर शिवसेनेचे २ तर मनसेचा एक उमेदवार निवडून आला होता.सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी होते. सरपंच अदिती अनिल नारकर, उपसरपंच सुर्यकांत शंकर कांबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. २.कुंभवडे ग्रामपंचायतीवर शिवसेनेचे पॕनल ४ जागा जिंकत विजयी झाले होते.तर भाजपचे ३ उमेदवार विजयी झाले होते.सरपंच नामाप्रसाठी राखीव होते.माञ शिवसेनेकडे या प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळे सरपंचपदी मिलिंद विजय गुरव यांना संधी मिळाली तर उपसरपंचपदी विनोद वसंत कदम यांची बिनविरोध निवड झाली आहे. ३. वेंगसर ग्रामपंचायत सरपंचपद नामप्र महिलेसाठी राखीव होते.सरपंचपदी सुगंधा रघुनाथ मंचेकर यांची उपसरपंचपदी समाधान दत्ताराम गुरव यांची बिनविरोध निवड झालेले आहे. ४.मांगवली ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सर्वसाधारण होते.सरपंचपदी सुवर्णा चंद्रकांत लोकम तर उपसरपंचपदी शिवाजी ज्ञानू नाटेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. ५ ऐनारी सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते.याठिकाणी भाजपचे ४, तर शिवसेनेचे ३ सदस्य होते.माञ शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही.त्यामुळे भाजपच्या समीक्षा सतीश गुरव यांची सरपंचपदी तर उपसरपंचपदी संजय देऊ कांबळे यांची निवड झाली आहे. ६.भुईबावडा ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सर्वसाधारण प्रर्वगासाठी होते.याठिकाणी सर्व उमेदवार भाजपचेच निवडूण आले होते.त्यामुळे सरपंचपदी बाजीराव अमृत मोरे तर उपसरपंचपदी स्वप्नाली गजानन देसाई यांची बिनविरोध निवड झाली आहे. ७.सांगुळवाडी सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव होते.याठिकाणी ७ पैकी ६ सदस्य हे भाजपचे आहेत.त्यामुळे सरपंचपदी गौरी भालचंद्र रावराणे तर उपसरपंचपदी राहूल भास्कर जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे ८.एडगाव सरपंचपद अनु.जाती महिलेसाठी राखीव होते.याठिकाणी सर्व सदस्य भाजपचे निवडून आल्यामुळे सरपंचपदी रविना रविंद्र तांबे, तर उपसरपंचपदी रविंद्र बाळकृष्ण रावराणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. खांबाळे ग्रामपंचायत सरपंच निवड बिनविरोध झाली असून याठिकाणी शिवसेनेच्या गौरी गणेश पवार सरपंचपदी तर उपसरपंचपदी गणेश प्रकाश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. तर निवडणूक झालेल्या कोकिसरे सरपंच आरक्षण सर्वसाधारण आहे. ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीत दत्ताराम सिताराम सावंत हे आठ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी शिवसेनेच्या स्नेहा सुनिल नारकर यांचा पराभव केला तर वसुधा नंदकुमार आम्रसकर यांनी आठ मतांनी सोनाली सुधीर पवार यांचा पराभव करुन उपसरपंच म्हणून निवडून आल्या आहेत. तर सर्वांचे लक्ष लागून राहीलेल्या आचिर्णे ग्रामपंचायत सरपंच आरक्षण सर्वसाधारण आहे. सरपंचपदी भाजपचे रुपेश सदानंद रावराणे ५ मतांनी विजयी झाले आहेत.त्यांनी महेंद्र भास्कर रावराणे यांचा पराभव केला.तर उपसरपंचपदासाठी गुप्त मतदान घेण्यात आले यामध्ये आश्चर्यकारकपणे शिवसेनेच्या सारिका संदीप कडू विजयी झाल्या आहेत. सोनाळी सरपंचपद हे अनु.जाती महिलेसाठी राखीव होते.माञ याठिकाणी अनु.जाती पुरुष सदस्य निवडूण आले होते.याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिल करण्यात आले होते.त्यानंतर याठिकाणी अनु.जाती पुरुष आरक्षण बदलून देण्यात आले.या प्रवर्गातून निवडून आलेले भिमराव भोसले यांची सरपंचपदीबिनविरोध निवड झाली आहे.तर अशोक चव्हाण उपसरपंचपदी बिनविरोध निवडूण आले आहेत. लोरे ग्रामपंचायत सरपंच निवडणूकीसाठी शिवसेनेकडून विलास नावळे
वैभववाडीत १३ पैकी १० ग्रामपंचायत वर भाजपचे सरपंच तर ९ ग्रामपंचायत वर उपसरपंच
