डिंगणे सरपंचपदी संजय डिंगणेकर बिनविरोध…

*💫बांदा दि.११-:* डिंगणे-गाळेल-डोंगरपाल ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गाव विकास पॅनेलचे संजय अर्जुन डिंगणेकर यांची तर उपसरपंचपदी जयेश कृष्णा सावंत यांची बिनविरोध निवड झाली. या ग्रामपंचायतीच्या ९ जागावर गाव विकास पॅनेलचे वर्चस्व आहे. ९ पैकी ५ जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. ४ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनेलच्या सर्व उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला होता. आज निवडणूक निर्णय अधिकारी रोहन जुवेकर यांनी सरपंच, उपसरपंच निवडीची प्रक्रिया पार पाडली. सरपंच पदासाठी संजय डिंगणेकर यांचा तर उपसरपंच पदासाठी जयेश सावंत यांचा एकमेव अर्ज आल्याने दुपारी दोन्ही निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या. यावेळी जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, देविदास नाडकर्णी, रोहित नाडकर्णी, राजन सावंत, भाजप मंडल अध्यक्ष महेश धुरी, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, माजी उपसभापती निकिता सावंत, प्रवीण देसाई, मधुकर देसाई, विनेश गवस यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी नूतन ग्रामपंचायत सदस्य संजय नाईक, आरोही गवस, आदेश सावंत, शैला नाडकर्णी, ऋतुजा नाईक, शालन सावंत, गीता सावंत यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page