*दोन्ही जिल्ह्यात अस्तित्व नसलेले निलेश राणे खासदार झाले हे दोन्ही जिल्ह्याचे दुर्दैव

*खासदार राऊत यांच्या दोन वेळा पराभूत झाल्यानेच माजी खासदार नीलेश राणे व्यथित

*संजय पडते यांची टीका*

सिंधूदुर्गनगरी ता ११ खासदार विनायक राऊत यांच्याकडून दोन वेळा पराभव झाल्याने व्यथित माजी खा. निलेश राणे विद्यमान खा. राऊत यांना फटके देण्यासारखे बेताल वक्तव्य करत आहेत. मुळात ज्यांचे अस्तित्वच जिल्ह्यात नाही अशी व्यक्ती २००९ च्या निवडणुकीत खासदार झाली हे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे दुर्दैव आहे. शिवसेना पोकळ धमक्यांना घाबरत नाही आणि पराभूत व्यक्तीकडून तर मुळीच नाही असे सांगतानाच माजी खासदार नीलेश राणे यांनी वेळ आणि जागा निश्चित करून खा. राऊत यांना सोडाच साध्या शिवसैनिकाला हात लावून दाखवावा मग शिवसेना काय आहे हे दाखवून देवू आव्हान शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी आज पत्रकार परिषदेत माजी खा. राणे यांना दिले आहे. खासदार विनायक राऊत यांनी भाजपचे खा. नारायण राणे यांच्या शिक्षणावर टीका केली होती. यावर माजी खा. निलेश राणे यांनी खा. राऊत यांच्यावर टीका करत त्यांना फटके देण्यात यावे असे वक्तव्य केले होते. या विधानाचा आज शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी खासदार विनायक राऊत यांचे संपर्क कार्यालय ओरोस येथे आयोजित पत्रकार परिषदेत चांगलाच समाचार घेतला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत, अतुल बंगे, विकास कुडाळकर, शिवसेना जिप सदस्य गटनेते नागेंद्र परब, ओरोस विभाग प्रमुख नागेश ओरोसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संजय पडते म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांनी माजी खा. निलेश राणे यांचा लोकसभा निवडणुकीत दोन वेळा दारुण पराभव केला आहे. या सलग दोन वेळा झालेल्या पराभवामुळे नीलेश राणे हे व्यथित झाले आहे. त्यामुळे ते काहीही वेताळ वक्तव्य करत आहेत. एखाद्या लोकप्रतिनिधीला फटके देण्याचे जाहीर वक्तव्य करून आपल्याला लोकशाही मान्य नाही गुंडगिरी हाच आपला पिंड असल्याचे नीलेश राणे सिद्ध करत आहेत. खा. नारायण राणे यांच्या पुण्याई मुळे नीलेश राणे हे सन २००९ च्या लोकसभा निवडणुकीत खासदार झाले. मात्र ज्याचे स्वतःचे अस्तित्व नाही अशी व्यक्ती खासदार झाली हे या मतदार संघाचे दुर्दैव आहेत असा टोला ही संजय पडते यांनी लावला. २०१४ व २०१९ च्या निवडणुकीत नीलेश राणे यांचा पराभव करून खासदार विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील गुंडगिरी हद्दपार केली आहे. अजून पराभव हवा असेल तर २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा उभे राहून दाखवावे. कोणी यावे कोणी मारावे ही आता जिल्ह्यात परिस्थिती राहिलेली नाही. शिवसेना कोणाच्या पोकळ धमक्यांना भीक घालत नाही. माजी खा. निलेश राणे यांनी वैफलग्रस्त होवून खा. विनायक राऊत यांना फटके देण्याची भाषा केली आहे. परंतु हिम्मत असेल तर त्यांनी वेळ आणि जागा निश्चित करून खासदार सोडाच पण शिवसेना कार्यकर्त्यांच्या केसाला तरी धक्का लावून दाखवा आणि शिवसैनिक काय आहेत याचा अनुभव घ्यावा असे आव्हान यावेळी संजय पडते यांनी पत्रकार परिषदेत दिले. सर्वसामान्य जनतेचा नेता अशी खा. विनायक राऊत ओळख आहे. खा. राऊत भजनी बुवा म्हणुन खिल्ली उडविणाऱ्या नीलेश ने साधे तबल वाजवून दाखवले असेही संजय पडते यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजपाने राणेंची संस्कृती स्वीकारली की काय ? आपल्या पेक्षा मोठ्या व्यक्तींवर तसेच असभ्य भाषेत टीका करणे ही भाजपाची संस्कृती नाही. तसेच नीलेश राणे यांच्या असभ्य भाषेचा भाजपने निषेध केला नाही. त्यामुळे भाजपाने गुंडगिरी प्रवृत्ती असलेल्या राणेंची संस्कृती स्वीकारली की काय असा प्रश्न ही सतीश सावंत यांनी यावेळी उपस्थित केला. जिल्हा पोलिस अधीक्षकांची लक्ष वेधणार निलेश राणे यांनी खासदार विनायक राऊत यांना पटकावण्याची भाषा करून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा तसेच शिवसैनिकांना भडकविण्याचा प्रयत्न केला आहे याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक यांचे लक्ष वेधण्यात येणार असल्याचे संजय पडते यांनी स्पष्ट केले

You cannot copy content of this page