⚡मालवण ता.१५-: मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा शुभारंभ भरड मालवण येथील श्री शिवाजी वाचन मंदिरच्या जुन्या इमारतीत करण्यात आला. पानिपत शौर्यदिन’ हा संदर्भ धरून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज, चंद्रगुप्त मौर्य- चाणक्य, थोर योद्धा तात्या टोपे, आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास सांगणाऱ्या पुस्तकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
यावेळी भंडारी हायस्कूलचे निवृत्त शिक्षक सदानंद पाटकर, न्हिवे- कातवड येथील वाचनप्रेमी सुधीर लोके, मॅक्सी डिसोजा, श्री शिवाजी वाचन मंदिरचे संतोष कोचरेकर, रत्नाकर कोळंबकर उपस्थित होते. सकाळी ९ ते दुपारी १ व सायंकाळी ४ ते ६ या वेळात हे प्रदर्शन वाचकांना पाहण्यासाठी निःशुल्क उपलब्ध असेल.
