21 वाहनधारकांना पियुसी काढत अपघात टाळण्यासाठी केले मार्गदर्शन
⚡सावंतवाडी ता.१५-: सावंतवाडी तालुक्यातील सातोळी-बावळाट येथे रस्ता सुरक्षा अंतर्गत आज सकाळी वाहतूक पोलिसांनी 30 वाहनचालकांवर कारवाई करत 7 हजार 200 रुपये दंड आकारण्यात आला. तसेच चालकांना अपघात टाळण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
सातोळी-बावळाट येथे वाहने तपासत असताना 21 वाहनधारक पियुसी नसलेले सापडले. तर 30 चालकांवर वेगवेगळ्या मोटर वाहन कलमाखाली कारवाई करण्यात आली. सदर कारवाई ए.एस.आय. अजित घाडी, पो.हे.कॉ. प्रवीण सापळे, मयूर सावंत व अमिता दळवी यांनी केली.
