मालवणात १९ व २० रोजी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम

⚡मालवण ता.१५-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात एनडीआरएफच्या २० जणांच्या टीम मार्फत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालवण तालुक्यात दि. १९ व २० जानेवारी रोजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दि. १९ रोजी सकाळी ११ वा. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे तर दि. २० रोजी सकाळी ११ वा. भंडारी ए. सो. हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे आपत्ती व्यवस्थापन विषयक प्रशिक्षण आयोजित केले आहे. यासाठी संपर्क अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी मालवण (पथकप्रमुख), तलाठी मालवण व तलाठी कुंभारमाठ यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. या प्रशिक्षणास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुका व जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page