सावंतवाडी तालुक्यातील ग्रामपंचायतला देणार भेट; सर्वांनी उपस्थित राहण्याचे रुपेश राऊळ यांचे आवाहन…*
⚡सावंतवाडी ता.१५-: शिवसेना उपनेते तथा जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दूधवडकर हे उद्या सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून ते उद्या सावंतवाडी तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ग्रामपंचायतीत भेट देत सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांची भेट संवाद साधणार आहे. तरी यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील सर्व गावातील व विभागातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व शिवसैनिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केले आहे.
