द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भाग्यलक्ष्मी लोके;तर तृतीय क्रमांक समृद्धी पेटकर ठरल्या विजेत्या._*
*💫कणकवली दि .११-:* कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” ही होम मिनिस्टर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रथम विजेत्या पूजा सातवसे होत पैठणीच्या मानकरी ठरल्या.तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या ठरल्या भाग्यलक्ष्मी लोके व तृतीय क्रमांक समृद्धी पेटकर विजेत्या ठरल्या आहेत. कणकवली पत्रकार संघाचा कौटुंबिक स्नेहमेळावा पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे पार पडला. या स्नेहमेळाव्यात सांस्कृतिक कार्यक्रम व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महिलांसाठी होम मिनिस्टर”खेळ पैठणीचा” तसेच पुरुषांसाठी संगीत खुर्ची या स्पर्धा घेण्यात आल्या. होम मिनिस्टर या स्पर्धेसाठी १५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. होम मिनिस्टर सुप्रसिद्ध निवेदक पत्रकार उमेश परब यांनी ही स्पर्धा विविध खेळांच्या आधारावर ५ फेऱ्यामध्ये घेतली. त्यात प्रथम द्वितीय व तृतीय विजेत्यांची नावे घोषित करण्यात आली.प्रथम पैठणी विजेत्या पूजा सातवसे यांना अध्यक्ष भगवान लोके,द्वितीय (कुकर ९ लिटर )विजेत्या भाग्यलक्ष्मी लोके यांना जेष्ठ पत्रकार संतोष वायगणकर,तृतीय विजेत्या समृद्धी पेटकर यांना कुकर (७ लिटर) देऊन गौरविण्यात आले.या स्पर्धेत गुण लेखन जान्हवी निमणकर यांनी काम पाहिले. तसेच पुरुषांसाठी आयोजित करण्यात आलेल्या संगीत खुर्ची या स्पर्धेमध्ये फोंडाघाट येथील पत्रकार कुमार नाडकर्णी, लोकमतचे ओंकार ढवण, जेष्ठांमधून पत्रकार तुषार सावंत,लहान मुलांमध्ये ऋग्वेद बाणे आदींनी स्पर्धेत बाजी मारली.त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचबरोबर सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शिरोडा येथील गायक युसुफ आवटी यांनी कराओके म्युझिकच्या माध्यमातून विविध मराठी, हिंदी गाण्यांची मैफिल सादर केली. त्याला साजेशी साथ पत्रकार स्वप्नील वरवडेकर,पपू निमणकर, अजित सावंत, रमेश जोगळे, संतोष राऊळ,संजय पेटकर,तुषार सावंत,राजन चव्हाण, सुधीर जोशी यांच्यासह काही पत्रकारांनी साथ दिली.
