दांडेली सरपंचपदी भाजपचे कृष्णा पालयेकर बिनविरोध…

विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत_

*💫बांदा दि.११-:* गेल्या पस्तीस वर्षांच्या राजकारणात आपण कोणावरही टीका केली नाही तर मतदारांना अपेक्षित कामे केली. त्यामुळेच गेली अनेक वर्षे शिवसेनेची सत्ता असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर आज भाजपचा झेंडा फडकला आहे. याचे सर्व श्रेय भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांना जाते, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कामत यांनी केले. नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप समर्थक सहा उमेदवार निवडून आले असून आज झालेल्या सरपंच व उपसरपंच निवडणुकीत कृष्णा पालयेकर यांची सरपंच तर सत्यनारायण माणगावकर यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शैलेश सावंत यांनी काम पाहिले. यावेळी सत्कारप्रसंगी प्रमोद कामत बोलत होते. भाजपा तालुकाध्यक्ष महेश धुरी, सावंतवाडी माजी उपसभापती संदीप नेमळेकर, रोणापाल सरपंच सुरेश गावडे, नवनिर्वाचित सरपंच कृष्णा पालयेकर, उपसरपंच सत्यनारायण माणगावकर, ग्रामपंचायत सदस्य रिचा शेटय़े, प्रतीक्षा खरात, नीलेश आरोलकर, प्रफुल्लता मालवणकर, बुथ अध्यक्ष रूपेश मोरजकर, निगुडे माजी सरपंच आत्माराम गावडे तसेच विघ्नेश गवस, मधु देसाई, प्रवीण देसाई, दुर्गेश मोरजकर, दादा गावडे, मनोज खरात, तंटामुक्ती समिती माजी अध्यक्ष देवेंद्र माणगांवकर, राजन मालवणकर, रमेश गावडे, विलास शेटय़े, सुनील मोरजकर, आदी उपस्थित होते. प्रमोद कामात पुढे म्हणाले की, आरोसमध्ये थोडी राजकीय गणिते चुकल्याने आज भाजपला अपेक्षित यश मिळाले नाही. परंतु भविष्यात नक्कीच पाच पेक्षा जास्त जागा जिंकुन आरोसमध्ये भाजपचा सरपंच बसेल अशी आपणास ग्वाही देतो, असे ते म्हणाले. सुरेश गावडे, महेश धुरी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिचा शेटय़े यांनी तर आभार अमोल आरोसकर यांनी मानले

You cannot copy content of this page