कुणकावळे ग्रामपंचायत सरपंच पदी मंदार वराडकर तर उपसरपंच पदी सुरेश राणे यांची बिनविरोध निवड

*💫मालवण दि.११-:* भाजपने वर्चस्व मिळवलेल्या कुणकावळे ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीत मंदार आनंद वराडकर यांची तर उपसरपंच पदी सुरेश राणे यांची बिनविरोध निवड झाली आहे . कुणकावळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने वर्चस्व मिळवत सात पैकी सहा जागांवर विजय मिळवला होता. तर एक जागा शिवसेनेने जिंकली होती. सरपंच आरक्षण सोडतीमध्ये कुणकवळे ग्रामपंचायतचे सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी आरक्षित झाले होते. सरपंच व उपसरपंच पदासाठी आज निवडणूक निर्णय अधिकारी श्री. घाडीगांवकर यांच्या उपस्थितीत पार पडली. सरपंच पदासाठी मंदार वराडकर व उपसरपंच पदासाठी सुरेश राणे याचे एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. अन्य अर्ज न आल्याने ही निवड प्रक्रिया बिनविरोध होऊन सरपंच पदी मंदार वराडकर आणि उपसरपंच पदी सुरेश राणे यांची निवड झाल्याचे निवडणूक अधिकारी घाडीगांवकर यांनी जाहीर केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद व्यक्त केला. निवडणूक अधिकारी घाडीगांवकर यांनी नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांना निवडीचे पत्र प्रदान केले. तर भाजपतर्फे उपस्थित असलेले मालवणचे उपसभापती राजू परुळेकर यांनी सरपंच व उपसरपंच यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. गावाने आपल्यावर दाखविलेला विश्वास आपण सार्थकी लावण्याचा प्रयत्न करू. गावतील विकासकामे मार्गी लावून गावच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध राहू, सर्वाना सोबत घेऊन काम करू असे यावेळी नूतन सरपंच मंदार वराडकर यांनी सांगितले. यावेळी प्रशासक कृष्णा पाताडे, ग्रामसेवक चौगुले, सदस्य शुभांगी मेस्त्री, जयवंत तेली, कार्तिकी निकम, देवयानी कदम, शिवसेनेच्या सदस्या श्रेया दळवी यांच्यासह आनंद वराडकर, दादा नाईक, सुनील नाईक, नारायण घाडी, सुरेश गावडे, मंगेश पोळ, बाबू बागवे, सूर्यकांत निकम, विनायक इंदुलकर, बळी करावडे, दिगंबर करावडे, प्रकाश राणे, मनीष सावंत, संदीप सावंत, बाळा कदम, गौरेश कुणकवळेकर, भाऊ कदम, तानाजी सावंत व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.

You cannot copy content of this page