*शिवसेनेच्या बालेकिल्लाला सुरुंग लावत भाजपची सत्ता आणली खेचून*
*💫आंबोली दि.११ विष्णू चव्हाण -:* चौकुळ ग्रामपंचायत मध्ये शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत चौकुळ ग्रामपंचायतीची सत्ता भाजपकडे एकहाती खेचून आणण्यासाठी गुलाब गावडे हे किंगमेकर ठरले आहेत. त्यांनी शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला जोराचा धक्का दिला आहे. चौकुळ ग्रामपंचायतीत गुलाब गावडे यांनी आखलेली रणनीती कामाला आली असून पाच वर्षानंतर त्यांची तपश्चर्या फळाला आली आहे. चौकुळ ग्रामपंचायत त्यांनी केलेल्या या कामगिरीमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. त्यावेळी ते बोलताना म्हणाले की, गावचा विकास आणि युवकांना रोजगार प्राप्त व्हावा त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. चौकुळ गावात आठवडा बाजार ही त्यांच्या विकासाची नांदी असणार आहे.
