⚡मालवण ता.१३-: मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर आणि समर्थ बिल्डर्स अँड डेव्हलपर्स मालवण यांच्या वतीने भ. क. ल. वालावलकर रुग्णालय व संलग्नित ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय सावर्डे तालुका चिपळूण यांच्या सहकार्याने दिनांक १५ जानेवारी आणि १६ जानेवारी या दोन दिवशी मालवण ग्रामीण रुग्णालय येथे विविध शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मालवणचे माजी नगरसेवक दिपक पाटकर यांनी दिली आहे.
या शिबिरात हृदयविकार, युरोलॉजी, अस्तिरोग, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया, कॅन्सर शस्त्रक्रिया, कान नाक व घसा इंटरव्हेशनल रेडिओलॉजी आणि जनरल सर्जरी या वरील आजारा बाबत तपासणी करुन अल्पदरात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांनी केशरी किंवा पिवळे रेशनकार्ड, आधारकार्ड, आणणे आवश्यक आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभही रुग्णांना दिला जाणार आहे. या शिबिरात भाग घेऊ इच्छिणाऱ्या रुग्णांनी दिपक पाटकर मोबाईल नं ९४२२५८४०७३, माजी नगरसेविका ममता वराडकर – ८२०८४५४९७५, स्मृती कांदळगावकर – ९४२२६३३७४५, राजू बिडये – ९४२०२६१३३२ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
