⚡मालवण ता.१३-: बेळगाव निवासी परमपूज्य सद्गुरू कलावती आई यांच्या पुण्यस्मरणानिमित्त मालवण वायरी येथील परमार्थ निकेतन (श्रीहरि मंदिर) येथे दि. १६ ते २२ जानेवारी या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ रोजी रात्री ८.३० ते ९.३० च्या गुरूपोर्णिमेच्या भजनाने सप्ताहास सुरूवात होऊन २३ जानेवारी रोजी सकाळी ७ ते ८.३० च्या गुरूमय गुणगानाने सप्ताहाची सांगता होईल.
यानिमित्त सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत अखंड नामस्मरण, ७ ते ८.३० वा. संगीत भजन (पुण्यतिथी प्रातःस्मरण), सकाळी १०.३० ते १२ संगीत भजन (पुण्यतिथी दुपारचा कार्यक्रम), सायंकाळी ४ ते ५.३० वा. संगीत भजन (पुण्यतिथी सायंस्मरण), रात्री ८.३० ते १० वा. श्रीकृष्ण प्रताप वाचन, संगीत गौळणी व प्रदक्षिणा आदी कार्यक्रम होणार आहेत.
