वायंगणी येथे मालवण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ

मालवण (प्रतिनिधी)

मालवण तालुक्यातील वायंगणी येथील ज्ञानदीप माध्यमिक विद्यालय येथे ५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा गुरुवारी शुभारंभ झाला. मालवण शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी संजय माने, ज्ञानदीप संस्थाध्यक्ष सदानंद राणे, शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आचरा केंद्रप्रमुख सुगंधा गुरव, संस्था सचिव वैभव जोशी, खजिनदार ऍड. समृद्धी आसोलकर, माजी सरपंचां संजना रेडकर, सर्व केंद्रप्रमुख, बीआरसीचे अधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षक, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

प्राचार्य पाटील यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे विद्यार्थी जीवनातील महत्व विषद केले. गटशिक्षणाधिकारी माने यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रतिकृतीबाबत विवेचन केले. संस्थाध्यक्ष राणे यांनी वायंगणी विद्यालयाला सुवर्ण महोत्सवी विज्ञान प्रदर्शनाचा बहुमान मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभूदास आजगावकर तर आभार केतकी बावकर यांनी मानले. विज्ञान प्रदर्शनाचे सुयोग्य नियोजन केल्याबद्दल मुख्याध्यापक डी. जे. टकले यांचे सर्व प्रशालांच्या वतीने कौतुक करण्यात आले.

You cannot copy content of this page