ग्राहकांना मिळणार समस्या मांडण्याची संधी;डेप्युटी जनरल मॅनेजर रवि किरण जणू यांची माहिती
⚡सावंतवाडी .ता.१३-: बीएसएनएल कार्यालयाच्या माध्यमातून 17 जानेवारी रोजी जिल्हास्तरीय ग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून हा मेळावा बीएसएनएल कार्यालय येथे सकाळी 10 ते 12 या या वेळेत होणार आसल्याची माहिती बीएसएनएलचे डेप्युटी जनरल मॅनेजर रवि किरण जणू यांनी दिली.
दरम्यान, यावेळी बीएसएनएल बाबत असलेल्या ग्राहकांच्या तक्रारी तसेच समस्या सोडवण्याच्या दृष्टीने हा मेळावा घेण्यात येणार असल्याचे श्री.जणू यांनी सांगितले. ते सावंतवाडी येथील बीएसएनएल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषद बोलत होते.
यावेळी प्रसाद पारकर, नितीन वाळके, नंदन वेंगुर्लेकर, सुनिल सूर्यवंशी, सुधार देशमुख आदी उपस्थित होते.
