नट वाचनालयात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी

बांदा/प्रतिनिधी
येथील नट वाचनालयात स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक अनंत भाटे व श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे खजिनदार प्रा. भूषण सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.


यावेळी वाचनालयचे सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, संचालक जगन्नाथ सातोसकर, अंकुश माजगावकर, प्रकाश पाणदरे, धोंडू फणशीकर, श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा संचालक निलेश मोरजकर, उपाध्यक्ष केदार कणबर्गी, अक्षय मयेकर, प्रवीण परब, स्वप्नीता सावंत, अर्चना सावंत, मिताली सावंत, ग्रंथपाल प्रमिला नाईक, सुनील नातू, अमिता परब आदी उपस्थित होते.
यावेळी दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ यांचे महान विचार व आचरण श्री भाटे, प्रा. सावंत यांनी व्यक्त केलेत. आभार राकेश केसरकर यांनी मानले.

You cannot copy content of this page