५० व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर
⚡सावंतवाडी ता.१३-: येथील ९ व १०जानेवारीला पार पडलेल्या ५०व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात विविध स्पर्धांमध्ये मिलाग्रीस हायस्कूलने आपले वर्चस्व राखले. प्रश्नमंजुषा स्पर्धा-प्राथमिक गटामध्ये कृष्णा महेश पास्ते व विलास रावजी सावंत तर माध्यमिक गटामध्ये तन्मय प्रसाद राणे इस्रायल आँल्विन डिसोजा प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले.
वक्तृत्व स्पर्धा माध्यमिक गटामध्ये* चैतन्य प्रदीप गावडे याने तृतीय क्रमांक पटकावला.तर विद्यार्थी शैक्षणिक साहित्य प्रतिकृती प्राथमिक गटामध्ये प्रणव संदीप पाटील याने तृतीय क्रमांक तर माध्यमिक गटामध्ये पियुष रघुनंदन माळकर याने तृतीय क्रमांक प्राप्त केला.
शिक्षक शैक्षणिक साहित्य प्रतिकृती मध्ये माध्यमिक गटामध्ये सौ वर्षा अमोल राणे यांनी तृतीय क्रमांक मिळविला तर प्रयोगशाळा सहाय्यक निर्मित शैक्षणिक साहित्यया गटात श्री. रवी सावंत तृतीय क्रमांक प्राप्त केला. सर्व यशस्वी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे मॅनेजमेंट, चेअरमन बिशप आँल्विन बरेटो,मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ यांनी अभिनंदन केले आहे.
