निपाणी येथील कॉलेज युवती आढळली आंबोलीत

रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी दिली पोलिसांना माहिती;पोलिसांनी केले नातेवाइकांच्या ताब्यात

⚡आंबोली, ता.१३-: निपाणी येथील महाविद्यालयीन तरुणी आंबोली परिसरात आढळून आली.येथील रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी आंबोली पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर पोलीस नाईक यांनी त्या युवतीला स्थानकात आणून वडिलांच्या मोबाईल वर संपर्क साधला यानंतर निपाणी पोलीस आणि नातेवाईक यांच्या स्वाधीन केले.८ जानेवारी पासून ही युवती बेपत्ता असल्याबाबत निपाणी शहर पोलीस स्थानकात अपहरणाचा गुन्हा नोंद आहे याबाबत महिला उपनिरीक्षक कृष्ण वेणी सीजी निपाणी शहर पोलीस तपास करीत आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, आंबोलीत एक महाविद्यालयीन युवती बुधवार पासून एकटी फिरत होती. गुरुवारी ती येथील रिक्षाचालक हर्षु कर्पे यांच्या रिक्षाने महादेवगड पॉईंट येथे गेली मात्र त्याठिकाणी कोण नसल्याने थोडा वेळ थांबून ते पुन्हा घेऊन आले. रिक्षाचे भाडे दिले त्यानंतर एका हॉटेल मध्ये जाऊन पुन्हा कावळेसाद पॉईंट येथे चालत जाताना दिसली.यावेळी रिक्षाचालक हर्षु कर्पे यांनी संबंधित एकटी युवती असल्याचे आंबोली पोलीस नाईक दीपक शिंदे यांना सांगितले यानंतर शिंदे यांनी तिला आंबोली पोलीस स्थानकात आणून विचारपूस केली. आणि तिच्या पालकांचा नंबर घेऊन संपर्क केला. यानंतर निपाणी पोलीस उपनिरीक्षक कृष्ण वेणी सीजी या ठिकाणी पालकांसोबत येऊन सोबत घेऊन गेले.संबंधित युवती अपहरण केल्याचा गुन्हा निपाणी येथे नोंद असल्याने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

येथील रिक्षाचालक हर्षु कर्पे याना निपाणी पोलीस उपनिरीक्षक यांनी बंद लिपाप्यातून बक्षीस म्हणून रक्कम दिली.

संबंधित युवती चे घरी भांडण झाले होते.त्यामुळे ती महाविद्यालयात जाते असे सांगून निघून आली होती असे तिने पोलिसांना सांगितले.८ तारीख पासून ती बेपत्ता आहे. निपाणी येथील चांगल्या घरातील ती मुलगी आहे. त्याबाबत निपाणी पोलीस तपास करीत आहेत. युवती एकटीच घाबरलेली भरकटत होती. तिला पुन्हा घर कुटुंब मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page