५ फेब्रुवारीला देवगड जामसांडे येथे मिसळ महोत्सव

भाजपचे आयोजन: आ नितेश राणे यांची माहिती

देवगड ता.१०-:
भारतीय जनता पार्टी देवगड
च्या वतीने ५फेब्रुवारी २०२३ रोजी देवगड जामसंडे शहर येथे मिसळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती आमदार नितेश राणे यांनी दिली.
देवगड जामसंडे शहरातील देवगड कॉलेज रोड सावंत कंपाउंड येथे दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजी या मिसळ
महोत्सवाचा शुभारंभ होणार आहे देवगड मध्ये हा पहिलाच मिसळ महोत्सव होत असून जिल्ह्यातील नामवंत मिसळचा आस्वाद देवगडमध्ये घेण्याची संधी मिळणार आहे. या निमित्ताने नागरिकांना एक वेगळा अनुभव मिळणार आहे. त्यामुळे बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढण्यासही हातभार लागेल पर्यटन व रोजगार ही दोन उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून या मिसळ महोत्सवाचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील नागरिकांना एक नवीन उपक्रम अनुभवता येणार आहे त्याचा लाभ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी घ्यावा असे आवाहनही आमदार नितेश राणे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page