Headlines

आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेचा ठाकरे गट संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्याहस्ते शुभारंभ

देवगड ता.१०:-
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांनी नेहमीच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन दिले असून असेच प्रोत्साहन आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीला दिले आहे .या आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफीच्या माध्यमातून गेली १७ वर्षे या भागातील चांगले खेळाडू घडविण्याचे कार्य झाले असून असून या उपक्रमांना आमचे सहकार्य नेहमीच राहील.असे प्रतिपादन कोल्हापूर सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी आनंदवाडी चॅम्पियम ट्रॉफी उदघाटन प्रसंगी बोलताना केले.आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी २०२३ चा उदघाटन सोहळा अरुण दुधवडकर,युवा सेना सचिव गीतेश राऊत,युवती सेनेच्या रुची राऊत,नगराध्यक्षा साक्षी प्रभू,तालुका प्रमुख मिलिंद साटम,उपतालुका प्रमुख निवृत्ती (बुवा)तारी फिशरमेन्स सोसायटी चेअरमन द्विजकांत कोयंडे व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दिपप्रजवलन करून श्रीफळ फोडून फित कापून मान्यवरांच्या हस्ते खेळपट्टी चे उदघाटन करण्यात आले.या सोहळ्यास नगरसेवक संतोष तारी, तेजस मामघाडी, विशाल मांजरेकरन युवासेना उपजिल्हाप्रमुख निनाद देशपांडे,प्रवीण नळेकर,प्रदीप कोयंडे, गणेश गावकर,संजय सोमण,महेश घारे, सुनील धुरी दिनेश पोसम संतोष दळवी,फरीद काझी, विकास कोयंडे महिला आघाडी प्रमुख हर्षा ठाकूर,निकिता जोशी,स्वप्नाली वाल्मिकी चिन्मया ठाकूर उपस्थित होते.स्पर्धेतील पहिला सामना यंगस्टार देवगड विरुद्ध वरद देवगड यांच्यात झाला.सूत्रसंचालन संजय धुरी यांनी केले.
आनंदवाडी क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने १० ते १४ जानेवारी या कालावधीत नवीन पोलीस स्टेशन देवगड एस . टी . स्थानकासमोरील मैदानात भव्य ओव्हरआर्म डे – नाईट क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे .
या स्पर्धेचाउपांत्य व अंतिम सामना १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता होणार आहे . या स्पर्धेत उपस्थित राहवे , असे आवाहन आनंदवाडी क्रिकेट क्लब व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे . स्पर्धेतील विजेत्या संघाला रोख तीन लाख रुपये व आनंदवाडी चॅम्पियन ट्रॉफी , तर उपविजेत्या संघाला रोख १ लाख ५० हजार रुपये व आनंदवाडी चॅम्पियन टॉफी देण्यात येणार आहे . स्पर्धेतील ‘ मॅन ऑफ दी सिरीज’चा किताब मिळविणाऱ्या खेळाडूला मोटारसायकल बक्षीस स्वरुपात देण्यात येणार आहे . तर प्रत्येक सामन्यातील पराभूत संघातील सामनावीरास आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . स्पर्धेत प्रथम नाव नोंदणी करणाऱ्या ३२ संघांना सहभाग देण्यात येणार आहे . सर्व संघांची राहण्याची व्यवस्था मंडळाच्यावतीने करण्यात येणार आहे . सुमारे ३५ हजार प्रेक्षक या स्पर्धेचा लाभ घेऊ शकतील , अशी भव्य बैठक व्यवस्था ( गॅलरी ) करण्यात येणार आहे . राष्ट्रीय दर्जाचे समालोचक कुणाल दाते ( नवी मुंबई ) , चंद्रकांत शेट्टे ( मुंबई ) , नरेश ढोमे ( पुणे ) , अशोक नाईक ( सिंधुदुर्ग ) हे या स्पर्धेचे समालोचन करणार आहेत . या स्पर्धेचे थेट प्रेक्षपण ‘ यू – ट्यूब द्वारे करण्यात येणार असून एकूण सहा ‘ हाय – डेफिनेशन ’ ( एचडी ) कॅमेरे स्पर्धेतील प्रत्येक क्षण जगभरातील क्रिकेट प्रेमींपर्यंत पोहोचविणार आहेत . संपूर्ण स्पर्धेतील प्रत्येक सामन्यावर ‘ थर्ड हंपायर’चीही नजर राहणार आहे .

You cannot copy content of this page