लंपी आजाराने बळी घेतलेल्या चार गुरांच्या मालकांना मिळणार नुकसानी

प्रस्ताव शासन दरबारी पाठविले

वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यामध्ये लंपी आजाराने 4 गुरे दगावली आहेत. दगावलेल्या गुरांच्या मालकांना मोबदला मिळणार असून काहीचे प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आले आहे. दरम्यान वैभववाडी तालुक्यामध्ये लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे या आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला नाही.
सध्या महाराष्ट्रामध्ये गुरांना होणाऱ्या लंपी आजाराने थैमान घातले आहे. या आजारामुळे गुरे दगावत आहेत. वैभववाडी तालुक्यामध्ये गाय, बैल अशी मिळून 9 हजारावर गुरे आहेत. या प्रजातीतील गुरांना लंपी आजार होतो. या आजारामध्ये वेळेवर उपचार झाले. नाही तर गुरे दगावण्याचा संभव असतो वैभववाडी तालुक्यांमध्ये लंपी आजारापूर्वी लसीकरण झाल्यामुळे तालुक्यात किरकोळ गुरांना आजाराचा प्रादुर्भाव झाला. आणि या आजारामध्ये सुमारे 4 गुरे दगावली यामध्ये करुळ मधील दोन एडगाव एक तर नावळे गावा एक असी 4 जनावरे दगावली आहेत. शासनाने लंपी आजारामध्ये दगावणाऱ्या गुरांच्या मालकांना मोबदला देण्याचे जाहीर केल्यामुळे या 3 गुरांच्या मालकांचे प्रस्ताव शासन दरबारी पाठवू काहींना मोबाइला मिळाला आहे.
वैभववाडी तालुक्यात लंपी आजाराने गुरे दगावली जाऊ नयेत ,म्हणून पशुवैद्यकीय विभाग तालुका पशु वैद्यकीय अधिकारी डॉ आबे, डॉ करपे प्रयत्न करत आहेत.

You cannot copy content of this page