⚡कणकवली ता.१०-: कणकवली नगरवाचनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात बचतगटातील महिलांसाठी ‘बचत
गटामुळे माझ्या जीवनात झालेले बदल’ या विषयावर स्पर्धा घेण्यात आली. यात गंधाली शिरोडकर यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. तर सिद्धी उम्ररजकर यांनी
द्वितीय तर पूर्वा सुतार यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला.
कणकवली नगरपंचायत व दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय उपजीविका अभियान अंतर्गत स्थापित नवदुर्गा वस्तीस्तर संघ आणि ‘मिळून साऱ्याजणी’
मासिकच्या शाखा सिंधुदुर्गतर्फे याठिकाणी ‘लिंग आधरित भेदभाव आणि हिंसा समाप्ती’ याविषयावर संवाद या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या अंतर्गत ही
स्पर्धा घेण्यात आली. यावेळी ‘मिळून साऱ्याजणी’ मासिक संपादिका गीताली वि. म,
डॉ. शामिता बिरमोळे, अर्पिता मुंबरकर, वैशाली कोरगावकर, विद्या घाणेकर, सृष्टी शिर्के, श्रीमती येरम, श्रद्धा कदम, न.पं.चे सहाय्यक प्रकल्प अधिकारी अमोल
भोगले, नवदुर्गा वस्ती स्तर संघाच्या अध्यक्षा प्रिया सरुडकर, उपाध्यक्ष सुवासिनी टकले, सचिव पूर्वा सुतार, खजिनदार आस्मा बागवान, शुभांगी उबाळे, शुभरत्ना राणे, सायली लाड, श्वेता नार्वेकर, प्रिती वाळके, वैशाली आरोलकर उपस्थित होत्या.
आरंभी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. यावेळी गिताली वि. म. यांनी महिलांना मार्गदर्शन
केले. सूत्रसंचालन पूजा सावंत यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.
