सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनुर्ली हायस्कूल प्रथम

⚡सावंतवाडी ता.१०-: मिलग्रिस हायस्कूल सावंतवाडी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात सोनुर्ली हायस्कूलचा विद्यार्थी कृष्णा विष्णू नाईक याने तयार केलेल्या होम सिक्युरिटी अलार्म या उपकरणाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले असून कुमार कृष्णा विष्णू नाईक व कुमार जिग्नेश आना गावकर यांना सिंधुदुर्ग जिल्हा शिक्षणाधिकारी सन्माननीय श्री महेश धोत्रे यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस वितरण करण्यात आले.

यावेळी व्यासपीठावर उपस्थित उपशिक्षणाधिकारी श्री शेर्लेकर साहेब, मिलाग्रिसचे प्राचार्य रिचर्ड सालदाना, उपप्राचार्या सिस्टर मेबल कार्वालो, पर्यवेक्षक मेघना राऊळ, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, सर्व केंद्रांचे केंद्रप्रमुख व मार्गदर्शक शिक्षक श्री पी.जी. काकतकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page