कलमठ- लांजेवाडी येथे 25 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा

⚡कणकवली ता.१०-: कलमठ- लांजेवाडी येथील श्री गणेश कृपा मित्रमंडळ यांच्यावतीने गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त दिनांक २३ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ७.३० वा. भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ती काही कारणास्तव त्या दिवशी मंडळाच्या वतीने रद्द करून ती स्पर्धा दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ठिक ७.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे.

तरी सहभागी सर्व संघाना याची मंडळाच्यावतीने कल्पना देण्यात येत आहे. तरी स्पर्धेकरिता अधिक माहितीसाठी संपर्क सागर पाष्टे ९४२०७२६०१४,राहुल चव्हाण ९४२०७५२५७५,महेश परब ९४०४१६६१२८ यांच्याजवळ साधावा तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला फुगडी संघांनी स्पर्धेत सहभागी व्हाव असे मंडळाच्या अध्यक्षांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page