सामाजिक कार्यकर्ते संजय लुडबे यांची संकल्पना
मालवण (प्रतिनिधी)
मालवण कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन नजीक सिद्धिविनायक पटांगणावर वायरी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय लुडबे यांच्या संकल्पनेतून प्रतिवर्षाप्रमाणे माघी गणेश गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्त दि. २४ जानेवारी ते २९ जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त मंगळवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. धार्मिक विधी दुपारी ४ वा. गणेश आगमन सोहळा, रात्री १० वा. श्री महापुरूष कलावैभव पारंपारीक दशावतार नाट्यमंडळ, देवबाग यांचा नाट्यप्रयोग, बुधवार दि. २५ जानेवारी रोजी सकाळी १० वा. गणेश मुर्तीचे पुजन, दुपारी १२.३० वा. महाप्रसाद, सायं. ७ वा. महाआरती व संगीत भजन, रात्री ९ वा. व्हरायटी शो R. D. X. Crew M.J. डान्स अॅकॅडमी, गुरुवार दि. २६ रोजी सकाळी ९वा. महाआरती, सकाळी १० वा. रक्तदान शिबीर, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्रौ ९ वा. बाळकृष्ण गोरे पारंपारीक दशावतार मंडळ, कुडाळ यांचे ‘मायाजाल” महापौराणिक नाटक, शुक्रवार दि. २७ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दुपारी १२.३० वा. प्रसाद सायं. ४.३० वा. हळदीकुंकु समारंभ, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन रात्रौ ९ वा. दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ, सिंधुदुर्ग यांचा ट्रिकसिन युक्त दशावतारी नाट्यप्रयोग ‘भेद कृष्मांडाचा महिमा टेंबलाईचा’, शनिवार दि. २८ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. महाआरती, सकाळी ११ वा. सत्यनारायणाची पुजा व तिर्थप्रसाद, दुपारी १२.३० वा. प्रसाद, सायं. ७ वा. महाआरती, सायं. ७.३० वा. संगीत भजन, रात्री ९.३० वा. कै. बाबू लुडबे यांच्या स्मरणार्थ भव्य रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा लहान व मोठा अशा दोन गटात होणार असून माहितीसाठी मंदार लुडबे ८५३०७२१८०० व अक्षय नरे ७७५७८८१८५५ यांच्याशी संपर्क साधावा. रविवार दि. २९ रोजी सकाळी ९ वा. महाआरती, दु. १२.३० वा. महाप्रसाद व सायंकाळी ४ वा. गणेश विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन संजय लुडबे, सौ. संजीवनी लुडबे, मंदार लुडबे तसेच व्यवस्थापक श्री रेकोबा मित्रमंडळ व माघी गणेश उत्सव मंडळ यांनी केले आहे.
