मालवणात वजन काटे फेरपडताळणी व मुद्रांकन शिबिर….

*💫मालवण दि.१०-:* वैध मापन शास्त्र विभाग मालवण निरीक्षक यांच्या वतीने वजन काटे, इलेक्ट्रिक काटे याचे फेर पडताळणी व मुद्रांकन करण्यासाठी (काटे, वजन, शिक्के करण्यासाठी) दैवज्ञ भवन, मालवण येथे रविवार दि. १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. तरी मालवण तालुक्यातील किराणा, भाजी, कारखाने, मिठाई, मच्छीमार, सराफ, काजू या प्रकारातील ज्या व्यापाऱ्यांचे सन २०२० मध्ये वजन, काटे, इलेक्ट्रिक काटे, छपाई करण्याचे राहिलेले आहे त्यांनी आपले वजन काटे मुद्रांकन करून घ्यावे, अधिक माहितीसाठी ९४२२५८४३०० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मालवण निरीक्षक यांनी केले आहे.

You cannot copy content of this page