वैभववाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठीच नगरसेवकांनी घेतला भगवा हाती

शिवसेना नेते अतुल रावराणे ;

*💫वैभववाडी दि.१०-:* भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊन शिवसेनेला आव्हान दिले होते ते दिल्लीला पोचेपर्यंत त्यांना वैभववाडीतून सहा नगरसेवकांनी सेनेत प्रवेश करून प्रत्युत्तर दिले आहे. वैभववाडी शहराच्या विकासाच्या नावाखाली आमदार नितेश राणे यांनी स्टंटबाजी केली आहे. यांच्या कारभाराला कंटाळून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी या सहा नगरसेवकांनी शिवसेनेचा भगवा हातात घेतला आहे. असे शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितले आहे नगरपंचायतीतील भाजपच्या सहा नगरसेवकांनी मंगळवारी मुंबई येथे शिवसेनेत प्रवेश केला आहे.त्यांच्या समवेत वैभववाडी शासकीय विश्रामगृह त बोलत होते.यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, तालुकाप्रमुख मंगेश लोके,स्वप्निल धुरी, प्रदीप रावराणे, अशोक रावराणे, सुनिल रावराणे, रणजीत तावडे, रविंद्र रावराणे, संजय चव्हाण, संतोष पवार, स्वप्निल इस्वलकर, रविंद्र तांबे आदी उपस्थितीत होते. राणे यांच्या खाजगी मेडीकलचे उद्दघाटन प्रसंगी खासदार नारायण राणे यांनी पञकार परिषदेत शिवसेनेवर टीका करतांना अमित शहा यांच्या पायगुणामुळे महाराष्ट्रात सतांतर , होऊन शिवसेना संपेल याला वैभववाडीतून प्रतित्युर दिले आहे.गृहमंञ्यांना खूष करुन काही पदरात पाडून घेण्यासाठी ही राणेंची नौटंकी असल्याचा आरोप त्यांनी केला. वैभववाडी नगरपंचायतीची एक हाती सत्ता असताना.शहराच्या गेल्या पाच वर्षात कोणतेच ठोस निर्णय घेण्यात आलेले नाहीत विकासाची दूरदृष्टी नाही.आमदार नितेश राणे यांनी राबविलेले उपक्रम म्हणजे स्टंटबाजी आहे.त्यांनी राबविलेल्या योजना या दोन तीन महीण्या पलिकडे सुरु राहीलेली नाही.औषध आपल्या दारीने कोणालाही औषध मिळालेले नाही.सेल्फी पाॕंईंट, अशी प्रसिध्दीसाठी स्टंटबाजी केली.त्यामुळे शहराच्या विकासासाठी या सहा नगरसेवकांनी हातात भगवा घेतला आहे.या नगरसेवकांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे स्वतःसाठी उमेदवारी मागीतली नाही.तर वैभववाडीच्या शहराला ेडसावणार्‍या पिण्याच्या पाण्यासाठी नळपाणी योजनेची मागणी केली आहे.मुख्यमंञ्यांनी या नगरसेवकांच्या मागणीला तात्काळ मान्यता देत मान्यता देत १४ कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे.लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पालकमंञी उदय सामंत, खासदार विनायक राऊत, पाणी पुरवठामंञी गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत या योजनेचा शुभारंभ होईल.असे ही रावराणे म्हणाले.

You cannot copy content of this page