आचरा येथील महिला बेपत्ता…

*💫मालवण दि.१०-:* आचरा बौद्धवाडी येथील सुमिता सुभाष आचरेकर वय ४२ हि महिला राहत्या घरातून बेपत्ता झाली असल्याची फिर्याद तिचे पती सुभाष अचरेकर यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत आपल्या पत्नीचे मानसिक संतुलन बिघडले असून ३ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घरातून रोजच्या प्रमाणे निघून गेली. मात्र ती परत घरी न आल्याने आजूबाजूच्या परिसरात, नातेवाईक यांच्यांकडे शोधाशोध केली. मात्र ती न सापडल्याने त्यांनी आचरा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याचा तपास आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संदिप कांबळे करत आहेत

You cannot copy content of this page